‘फोर्ब्स’; ‘या’ टॉप १० अभिनेत्री आहेत सर्वात महाग


‘फोर्ब्स’ यादीनुसार स्कार्ले़ट जॉनसन ही जगातील सर्वात महागडी अभिनेत्री ठरली आहे. तिने सलग दुसऱ्यांदा तिचे या यादीतील पहिले स्थान कायम ठेवले आहे. स्कॉरलेटने हे स्थान सोफिया वरगारा, रिस विथरपून आणि निकोल किडमॅन आणि इतर अनेक अभिनेत्रींना मागे टाकत पटकावले आहे.

हॉलिवूड अभिनेत्री स्कारलेट जॉनसन हिने सलग दुसऱ्या वर्षी फोर्ब्सच्या यादीत पहिले स्थान मिळवले आहे. ती जगातील सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री ठरली आहे. जॉनसनची कमाई ५६ मिलियन डॉलर (४०२ कोटी) एवढी आहे.

दुसरे स्थानी अभिनेत्री सोफिया वेरगारा ही विराजमान असून हिला मिळाले आहे. तिची कमाई ४४.१ (३१६.५८ कोटी) मिलियन डॉलर एवढी आहे.

तिसऱ्या स्थानी विराजमान असलेल्या रीस विथरपून हिची ३५ मिलियन डॉलर (२५० कोटी) एवढी आहे.

ऑस्कर पुरस्कार मिळवलेली चार्लिज थेरन या यादीत चौथ्या स्थानी असून तिची २३ मिलियन डॉलर (१६४ कोटी) एवढी कमाई आहे.

अभिनेत्री जेनिफर एनिस्टर या यादीत पाचव्या स्थानी विराजमान आहे. तिची २८ मिलियन डॉलर (२०१ कोटी) एवढी कमाई आहे.

सहाव्या स्थानी विराजमान असलेली द बिग बॅग थिअरी’ चित्रपटाची अभिनेत्री केले कुकू हिची कमाई तब्बल २५ मिलियन डॉलर (१७८.७८) कोटी एवढी आहे.

नवोदित अभिनेत्री एलिझाबेथ मॉसने या यादीत सातवे स्थान पटकावले असून तिची २४ मिलियन डॉलर (१७१.६३ कोटी) एवढी कमाई आहे.

ऑस्कर पुरस्कार विजेती अभिनेत्री चार्लिज थेरन या यादीत आठव्या स्थानी असून तिची २३ मिलियन डॉलर (१६४ कोटी) कमाई आहे.

या यादीत नवव्या स्थानी वन्स अपॉन अ टाईम इन हॉलिवूडची अभिनेत्री असलेली माग्रेट रॉबी असून तिची २३.५ मिलियन डॉलर (१६८.०५ कोटी) कमाई आहे.

तर या यादीत 10 व्या स्थानी ‘ग्रे एनाटमी’ची अभिनेत्री एलन पॉमपीओ विराजमान असून तिची २२ मिलियन डॉलर (१५७ कोटी) एवढी कमाई आहे.

Leave a Comment