दक्षिण कोरियात रिलीज होणार संजय दत्तचा पहिला मराठी चित्रपट


‘बाबा’ या चित्रपटाच्या माध्यमातून अभिनेता संजय दत्तने मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. भारतात २ ऑगस्टला संजय दत्तची निर्मिती असलेला हा चित्रपट रिलीज झाला होता. चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसादही मिळाल्यानंतर आता हा चित्रपट दक्षिण कोरियातदेखील प्रदर्शित करण्यात आला आहे.

वडील आणि मुलाचे अबोल नाते उलगडण्यात ‘भावनेला भाषा नसते’, अशी दमदार टॅगलाईन असलेल्या ‘बाबा’ चित्रपटातून आले आहे. आपल्या मुलासाठी संघर्ष करणारा ‘बाबा’ या चित्रपटात पाहायला मिळतो. प्रत्येक सामान्य व्यक्तीला आपलासा वाटणारा हा प्रवास प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला.

चित्रपटात अभिनेता दीपक दोबरियाल, नंदीता धुरी, अभिजीत खांडकेकर, स्पृहा जोशी आणि बालकलाकार आर्यन मेघजी यांच्या मुख्य भूमिका आहेत. दरम्यान या चित्रपटाची ‘गोल्डन ग्लोब २०२०’ साठी विदेशी भाषा या श्रेणीमध्येदेखील निवड करण्यात आली आहे.

Leave a Comment