आजच्या तरुणींना लाजवेल अशी आहे या आजीबाईंची फिटनेस


मेलर्बनमध्ये राहणाऱ्या लेस्ली मॅक्सवेल या महिलेचे वय ६३ वर्षे असून त्यांना तीन नातवंडे आहेत. पण सध्याच्या तरूणीही लाजतील असे त्यांचे सौंदर्य, त्यांचा फिटनेस आणि त्यांची फीगर आहे. या वयातही आठवड्यातून पाच दिवस लेस्ली एक्सरसाइज करतात. त्याचबरोबर त्यांचे या वयातही सिक्स पॅक अ‍ॅब्स आहेत. त्या स्वत: तर फिट राहतातच त्याचबरोबर त्या दुसऱ्यांनाही फिट राहण्यासाठी मार्गदर्शन देखील करतात. यात विशेष म्हणजे त्या त्यांच्यापेक्षा वयाने १० ते २० वर्षे लहान असलेल्या पुरूषांना डेट करते.

लेस्ली सांगतात की, त्या खूप खूश आहेत. कारण त्यांच्यात एक नवा आत्मविश्वास बॉडी बिल्डिंगने निर्माण केला आहे. त्यांच्या नावावर ३० पेक्षा अधिक फिटनेस खिताब आहेत. पण त्या आधीपासून अशा नव्हत्या. १५ वर्षांआधी त्यांचा घटस्फोट झाला होता. लेस्लींचे पती त्यांच्यापेक्षा १३ वर्षांनी लहान होते. लेस्ली यांचे वय त्यावेळी ४८ होते. त्यावेळीच त्यांनी फिटनेसला आपले लक्ष्य बनवले.

त्यांचे रुप जिम सुरू केल्यावर एका वर्षातच बदलून गेले होते. त्या सांगतात की, पतीपासून वेगळी झाल्यावर माझ्या लाइफस्टाईलमध्ये फार जास्त बदल झाला. कमी वयाच्या पुरूषांनी मला नेहमीच डेटिंगसाठी अप्रोच केले. एक्सरसाइज सुरू केल्यावर मला स्वत:मध्ये फार बदल दिसले आणि मला ते खूप आवडले.

लेस्ली दावा करतात की, आजही आपण मुलांपेक्षा अधिक फिट असून त्यांच्यापेक्षा जास्त वजन मी उचलू शकते. मला आई म्हणायची की, मुलांना मसल्स असलेल्या मुली आवडत नाही. पण मी आता हे म्हणू शकते की, असे काही नाही.

आता एक फिटनेस गुरू म्हणून लेस्ली या लोकप्रिय आहेत. त्यांना फिटनेस आणि ग्लॅमरच्या दुनियेने पूर्णपणे बदलले आहे. लेस्लीने त्यांच्या फिटनेस गुपितही जगजाहीर केले. त्या सांगतात की, जंक फूड, तेल, तूपाच्या पदार्थांपासून मी दूर राहते. मी केवळ प्रोटीन आणि पौष्टीक आहार घेते. तसेच डेडलिफ्ट, स्क्वाट्स आणि अ‍ॅब्स माझ्या फेवरेट एक्सरसाइज आहेत.

Leave a Comment