रेल्वे स्टेशनवरील ‘त्या’ गायिकेला बॉलीवूडच्या रॉकस्टारने दिली संधी


पश्चिम बंगालमधील रानू मंडल सोशल मीडियावर एका रात्रीतच आपल्या आवाजामुळे प्रसिद्ध झाल्या. सोशल मीडियावर स्टेशनवरील त्यांचा गाणे गातानाचा व्हिडिओ व्हायरल झाला आणि त्यांच्या आवाजाची भूरळ सर्वांनाच पाडली. त्यांचा हा व्हिडीओ बॉलीवूडचा रॉकस्टार अर्थात संगीतकार हिमेश रेशमियानेही पाहिला. त्यालाही त्यांचा आवाज प्रचंड आवडला. त्याने त्यांना त्याच्या आगामी चित्रपटासाठी गाणे गाण्याची संधी दिली आहे.


हिमेश रेशमियाने स्वत: त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर रानू मंडलचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. हिमेशने त्याच्या आगामी ‘हॅप्पी, हार्डी अँड हीर’ या चित्रपटासाठी रानूला गाण्याची संधी दिली आहे. लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला त्यांच्या आवाजात असलेले गाणे येणार आहे. या गाण्यात हिमेश रेशमियानेही त्यांना साथ दिली आहे.

या गाण्याचे रेकॉर्डिंगही करण्यात आले आहे. तर, हिमेशने दिलेल्या संधीमुळे रानू देखील आनंदी असल्याचे पाहायला मिळत आहे. एका माध्यमाने दिलेल्या वृत्तानुसार, रानू ‘सुपरस्टार सिंगर’ या रिअॅलिटी कार्यक्रमातही सहभागी होणार आहे.

Leave a Comment