डीएसकेंच्या 13 आलिशान गाड्यांचा होणार लिलाव


पुणे – बांधकाम व्यावसायिक डी.एस. कुलकर्णी गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याप्रकरणी सध्या येरवड्याच्या मध्यवर्ती कारागृहात असून न्यायालयाने त्यांच्या जप्त केलेल्या 13 आलिशान गाड्यांचा लिलाव करण्यास परवानगी दिली आहे. हा आदेश विशेष न्यायाधीश ए. एस. भैसारे यांच्या न्यायालयाने दिला. एक पोर्शे, दोन बीएमडब्ल्यू, एक एमव्ही आगस्टा आणि टोयोटा इनोव्हाच्या पाच गाड्यांचा यामध्ये समावेश आहे. अंदाजे पाच ते सहा कोटी इतकी या सर्व गाड्यांची किंमत आहे.

कुलकर्णी कुटुंबातील सात जणांना ‘डीएसके’ घोटाळ्यात आतापर्यंत अटक करण्यात आली आहे. हा घोटाळा उघडकीस आल्यानंतर 33 हजार लोकांनी पोलिसात तक्रार दिली होती. त्यानंतर, सक्तवसुली संचालनालयने (ईडी) केलेल्या चौकशीत कुलकर्णी कुटुंबीयांची देश-विदेशात हजारो कोटी रुपयांची मालमत्ता असल्याचे उघडकीस झाले आहे. पुण्यातील धायरी, बाणेर, बालेवाडी, पिरंगुट, बावधन, किरकीटवाडी या भागांमध्येही त्यांची शेकडो कोटींची मालमत्ता असल्याचे उघडकीस आले आहे.

Leave a Comment