विकी-नोराच्या ‘पछताओगे’चा टीझर रिलीज


उरी-द सर्जिकल स्ट्राइक चित्रपटातील अभिनयासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कार अभिनेता विकी कौशलला जाहिर झाल्यानंतर आता तो लवकरच नोरा फतेहीसोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे.

कोणत्या चित्रपटासाठी नव्हे तर एका गाण्यासाठी ही जोडी एकत्र आली आहे. भूषण कुमार यांच्या म्यूझिक व्हिडिओमधून हे दोघे प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून नुकताच ‘पछताओगे’ असे बोल असलेल्या या गाण्याचा टीझर रिलीज करण्यात आला आहे. ४३ सेकंदाच्या या टीझरमध्ये निर्मात्यांनी प्रेमात असलेल्या व्यक्तीच्या भावना उत्तम पद्धतीने मांडल्या आहेत. टीझरमधील नोराचा डान्स आणि विकीचा नेहमीप्रमाणंच असणारा अप्रतिम अभिनय प्रेक्षकांची गाण्याबद्दलची उत्कंठा वाढवणारा आहे. अरिजीत सिंहने या गाण्याला आवाज दिला आहे.

दरम्यान या गाण्याचे पहिले पोस्टर काही दिवसांपूर्वीच रिलीज करण्यात आले होते. विकी आणि नोराचा रोमँटिक अंदाज ज्यात पाहायला मिळाला. नोराच्या दिलबर दिलबर आणि ओ साकी साकी गाण्यांनी प्रेक्षकांची मने जिंकली. तिचे हे वेगळ्या अंदाजातील गाणे आता प्रेक्षकांच्या पसंतीस उतरणार का? हे आगामी काळाच ठरवेल.

Leave a Comment