६०० रुपयांच्या साडीमुळे ट्रोल झाली कंगना


आपल्या पैकी अनेकांनी बॉलीवूडची क्वीन कंगना राणावत हिचे साडीवर असलेले प्रेम अनेकदा पाहिले असेलच. काही दिवसांपूर्वीच कंगणाची बहिण रंगोलीने कंगनाचा विमानतळावरील एक फोटो शेअर करत तिच्यावर स्तुती सुमने उधळली होती. पण नेटकऱ्यांच्या पचनी रंगोलीची ही पोस्ट पडलेली दिसत नाही. म्हणूनच रंगोलीला नेटकऱ्यांनी चांगलेच सुनावले आहे.

आपल्या सोशल मीडियावरुन रंगोलीने कंगनाचा फोटो शेअर केला होता. तिने ज्याला दिलेल्या कॅप्शनमध्ये, केवळ ६०० रुपयांची कंगनाने घातलेली साडी असून बाहेर देशातील महागड्या वस्तू खरेदी करण्यापेक्षा देशात तयार होणाऱ्या वस्तू खरेदी करा, असे रंगोलीने म्हटले होते.

नेटकऱ्यांनी तिच्या याच पोस्टवरुन कंगनाला ट्रोल केले आहे. ६०० रुपयांची साडी नेसून २-३ लाखांची बॅग हातात घेते…केवळ एक साडी विकत घेतल्याने देश सक्षम होत नाही. लोकांना सक्षम बनवा, असे काहींनी म्हटले आहे. तर तिच्या सनग्लासेसची किंमत विचारत, काहींनी फेक होने की भी कोई लिमीट होती हैं, असे म्हटले आहे.

Leave a Comment