रिलीज झाले सोनमच्या ‘द झोया फॅक्टर’चे मोशन पोस्टर


आगामी ‘द झोया फॅक्टर’ या चित्रपटात अभिनेत्री सोनम कपूर झळकणार आहे. ती वेगळ्या भूमिकेत या चित्रपटात दिसेल. नुकताच प्रदर्शित झालेल्या मोशन पोस्टरवरुन याचा प्रत्यय येतो. या पोस्टरचे वेगळेपण डोळ्यात भरण्यासारखे आहे.


सोनम या पोस्टरमध्ये देवीच्या रुपात दिसत आहे. तिच्या डाव्या हातामध्ये क्रिकेटची बॅट असून उजव्या हातात हेल्मेट दिसते. गळ्यामध्ये पुष्पहार आणि दागिने दिसतात. भरजरी साडी परिधान केलेल्या देवीसदृष्य सोनमच्या मागे वलय निर्माण झाल्याचा भास निर्माण करण्यात पोस्टरला यश आले आहे. अभिषेक शर्मा हे ‘द झोया फॅक्टर’चे दिग्दर्शन करणार असून फॉक्स स्टार स्टुडिओ, पूजा शेट्टी आणि आरती शेट्टी याची निर्मिती करणार आहेत. सलमान दुलकर आणि सोनम कपूरची जोडी पडद्यावर पाहायला मिळेल. हा चित्रपट २० सप्टेंबरला प्रदर्शित होईल.

Leave a Comment