आईच्या सवतीसोबत साराचे आहेत मैत्रीपूर्ण संबंध


अभिनेत्री सारा अली खानने नुकत्याच एका मुलाखती दरम्यान आपल्या आईच्या सवतीसोबत असलेल्या संबंधांबाबत खुलासा केला आहे. सैफ अली खानची दुसरी पत्नी करिना कपूर आणि आपले मैत्रीपूर्ण संबंध असून मी तिची खूप मोठी चाहती असल्याचे साराने या मुलाखतीत सांगितले आहे.

सारा म्हणाली, मैत्री आणि सन्मान दोन्ही आमच्या नात्यात असून माझी करिना कपूर चांगली मैत्रीण आहे. मात्र, यापेक्षाही जास्त ती माझ्या वडिलांची पत्नी आहे. मला असे वाटते, की माझ्या वडिलांना ती आनंदी ठेवते. आम्ही दोघीही एकाच क्षेत्रात काम करतो.

सैफची पहिली पत्नी अमृता सिंग यांची सारा मुलगी आहे. २००४ साली सैफ आणि अमृता यांचा घटस्फोट झाला. तर सैफने २०१२ मध्ये करिनासोबत लग्नगाठ बांधली. सैफ आणि अमृताला सारा अन् इब्राहिम ही दोन मुले आहेत. तर करिना आणि सैफला तैमूर अली खान हा मुलगा आहे.

Leave a Comment