सुनील शेट्टीच्या ‘पहलवान’चा ट्रेलर रिलीज


नुकताच अभिनेता सुनील शेट्टी आणि दाक्षिणात्य अभिनेता के. सुदीप यांच्या ‘पहलवान’ चित्रपटाचा ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे. सुनील शेट्टी ‘पहलवान’ चित्रपटाद्वारे दाक्षिणात्य सिनेसृष्टीत पदार्पण करत आहे. हिंदीसह तब्बल पाच भाषांमध्ये हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

या चित्रपटाचे पोस्टर आणि दोन गाणी काही दिवसांपूर्वीच रिलीज करण्यात आली होती. सुनील शेट्टी आणि के. सूदीपचा फर्स्ट लूक देखील रिलीज झाला होता. सुनील शेट्टी या चित्रपटात ‘सरकार’ या भूमिकेत दिसणार आहे. तर, सुदीपला तो कुस्तीचे धडे देताना ट्रेलरमध्ये पाहायला मिळतो. क्रिश्ना यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. हिंदी, कन्नड, तमिळ, तेलुगू आणि मल्याळम या भाषेत हा चित्रपट १२ सप्टेंबरला प्रदर्शित होणार आहे.

Leave a Comment