का बरं व्हायरल होत आहे हे टाळे ?


सध्याच्या डिजीटल युगात कोण केव्हा प्रसिद्ध होईल याचा काही नेम नाही. त्यातच आता अवघ्या अल्पवधीतच टीक-टॉक या अॅपची क्रेझ ऐवढी वाढली आहे कि दिवसेंदिवस या अॅपवर हजारोंच्या संख्येने व्हिडीओ शेअर केले जातात. त्यातील काही व्हिडीओ व्हायरल होतात. त्यातीलच एक व्हिडीओ सध्या जोरदार व्हायरल होत आहे.

सोशल मीडियावर सध्या एका स्मार्ट टाळ्याचा व्हिडिओ लोकांना आकर्षित करून घेत आहे. एक मोठ्या आकाराचे टाळे या व्हिडिओमध्ये दिसत आहे. वापरकर्त्याच्या हातात या टाळ्याची चावीही आहे. पण, ही चावी लावण्यासाठी कोणतेही ऑप्शन टाळ्यावर दिसत नाही. मग टाळे उघडणार कसे? असा प्रश्न तुम्हाला व्हिडीओ पाहिल्यावर नक्कीच पडेल. पण त्यासाठी तुम्हाला आधी हा व्हिडीओ जरुर पहावा लागले. सोशल मीडिया युझर्सकडून या टाळ्याचे कौतुक होत आहे. हे टाळे युनिक असल्याचे कुणी म्हटले तर कुणी हे टाळे स्मार्ट असल्याचे सांगत आहेत.

Leave a Comment