आणखी एक क्रिकेटपटू होणार भारताचा जावई


दुबईमध्ये भारताच्या शामिया आरजूशी पाकिस्तानचा जलद गोलंदाज हसनी अलीने विवाह केला. गेल्या तीन वर्षांपासून हरियाणात राहणारी शामिया ही दुबईमध्ये राहत आहे. हे दोघे नुकतेच विवाहबंधनात अडकले. दरम्यान हसन अलीनंतर आता आणखी एक मोठा क्रिकेटपटू भारतीय तरूणीशी विवाह बंधनात अडकणार आहे. ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू खेळाडू ग्लेन मॅक्सवेल हा भारतीय वंशाच्या महिलेशी लग्न करणार आहे.

भारतीय वंशाच्या विनी रमन या महिलेच्या ग्लेन मॅक्सवेल प्रेमात पडला असून हे दोघे गेली काही वर्ष रिलेशनशिपमध्ये आहेत. सोशल मीडियावर मॅक्सवेल आणि विनी रमन यांचे फोटो व्हायरल होत असतात. विनीसोबतचा फोटो मॅक्सवेलने स्वत: शेअर केला होता. दरम्यान विनी आणि मॅक्सवेल कधी लग्न करणार याबाबत माहिती नसली तरी, मॅक्सवेल लवकरच भारताचा जावई होणार असे दिसत आहे.

Leave a Comment