ही मास्कधारी व्यक्ती लोकांच्या घराबाहेर ठेवत आहे टिव्ही


अमेरिकेतील वर्जिनिया येथे एक व्यक्ती लोकांच्या घराबाहेर जुने टिव्ही ठेवत आहे. हा व्यक्ती मध्यरात्री येतो आणि टिव्ही घराबाहेर ठेऊन निघून जातो. आपली ओळख लपवण्यासाठी या व्यक्तीने तोंडावर टिव्ही सारखा मास्क देखील लावला आहे. 10 ऑगस्टच्या रात्री या व्यक्तीने जवळपास 50 जणांच्या घराबाहेर टिव्ही ठेवला आहे.

या व्यक्तीच्या असे करण्याने अद्याप कोणालाच काहीही नुकसान झालेले नाही. मात्र त्याच्या या कृत्याने सर्वच हैराण झाले आहेत. स्थानिक लोकांनी सांगितले की, हे विचित्र आहे. मात्र यामुळे कोणालाच त्रास झालेला नाही.

सिक्युरिटी कँमेऱ्यात या घटनेचा व्हिडीओ कैद झाला. व्हिडीओमध्ये दिसून येते की, मास्क लावलेला व्यक्ती येतो. घरासमोर टिव्ही ठेवतो व जाताना कँमेऱ्याकडे हात देखील दाखवतो.

पोलिसांचे म्हणणे आहे की, एकापेक्षा अधिक लोकांनी हे टिव्ही घरासमोर ठेवले असतील. विचित्र घटना असली तरीही काळजी करण्यासारखे काहीही कारण नाही. याआधी देखील 2018 मध्ये अशाच प्रकारचा एक फ्रँक करण्यात आला होता. त्याघटनेमध्ये देखील 20 पेक्षा अधिक टिव्ही घरासमोर ठेवण्यात आले होते.

आतापर्यंत कोणत्याही व्यक्तीला अटक करण्यात आलेली नाही. मात्र पोलिसांनी जर कोणी काहीही विचित्र गोष्ट बघितली तर त्यासाठी पोलिस क्रमांकावर कॉल करण्याची देखील सुचना दिली आहे.

Leave a Comment