अमेरिकेचे माजी राष्ट्रपती बराक ओबामा यांच्या जुन्या बास्केटबॉल जर्सीची सोमवारी तब्बल 85.86 लाख रूपयांना विक्री झाली. 23 क्रमांकाच्या या जर्सीला ओबामा यांनी 1979 मध्ये ते 18 वर्षांचे असताना खरेदी केले होते.
तब्बल एवढ्या लाखांना झाली ओबामांच्या 39 वर्ष जुन्या जर्सीची विक्री
विक्री आधी जर्सीची किंमत 1 लाख डॉलर एवढी ठेवण्यात आली होती. ही जर्सी आता अमेरिकेच्या खेळाविषयींच्या वस्तू संग्रह करणाऱ्याने खरेदी केले आहे. खरेदी करणाऱ्या व्यक्तीच्या नावाची अद्याप माहिती मिळू शकलेले नाही. ओबामा यांनी ही जर्सी ते हवाई येथील पुनाहौ स्कूलमध्ये सिनियर होते तेव्हा घातली होती. त्यावेळी ते हवाई येथे राहत असे.
1978-79 President Barack Obama Game Worn Punahou (HI) High School Basketball Jersey, consigned to auction by a fellow Punahou graduate. 🏀
August 17 – 18 Summer Platinum Night Sports Collectibles Sale, No. 50016 #HeritageAuctions #HASports @BarackObamahttps://t.co/RUD8OZVkZX pic.twitter.com/PQKmSILHfA
— Heritage Auctions (@HeritageAuction) August 5, 2019
अमेरिकेचे माजी राष्ट्रपती असणाऱ्या ओबामा यांना बास्केटबॉल खेळ खेळणे खूप आवडते. व्हाईट हाऊसमध्ये असताना देखील ते स्टाफ, सेलिब्रेटिज आणि नातेवाईकांबरोबर अनेकवेळा हा खेळ बघायला जात असे. तसेच आता विक्रीचा काही भाग हा शाळेला मदत म्हणून देखील देण्यात येणार आहे.