बहुप्रतिक्षित ‘सैरा’चा टीझर रिलीज


दाक्षिणात्य सुपरस्टार्स, बॉलिवूड सुपरस्टार आणि दिग्गज स्टार्सचा भरणा असलेल्या आणि आंध्र प्रदेशातील एका लढाऊ योद्ध्याची कथा असलेल्या सैरा नरसिम्हा रेड्डी चित्रपटाची उत्सुकता शिगेला पोहोचली असून नुकताच या चित्रपटाचा दमदार टीझर रिलीज करण्यात आला आहे.

‘सैरा नरसिंह रेड्डी’ या चित्रपटातील सर्व कलाकारांचे लूक समोर आल्यानंतर या चित्रपटाचा टीझर रिलीज करण्यात आला आहे. चित्रपटातील सर्व कलाकारांची दमदार झलक या टीझरमध्ये पाहायला मिळते. या टीझरची सुरुवात अमिताभ बच्चन यांच्या आवाजात होते. प्रेक्षकांसाठी दमदार अॅक्शन सिन्स, भव्यदिव्य सेट आणि तगडी स्टारकास्ट असलेला हा चित्रपट पर्वणीच असणार आहे.

अमिताभ बच्चन, चिरंजीवी, कन्नड सुपरस्टार के सुदीप, विजय सेतुपती, नयनतारा, तमन्ना आणि रवीकिशनसारखे दिग्गज कलाकार झळकणार आहेत. भारतीय स्वातंत्र्य लढ्यात ब्रिटीशांविरुध्द एल्गार पुकारणााऱ्या स्वातंत्र्य सैनिकाची ही सत्यकथा आहे.

Leave a Comment