Video : अबब.. चक्क जाळीवर चढून आत शिरली मगर


सध्या एका मगरीचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या मगरीने केलेला कारनामा देखील हैराण करणारा आहे. फ्लोरिडा येथे मगरीने सुरक्षेसाठी लावलेल्या जाळीवरून चढत नौदलाच्या एअर स्टेशनमध्ये प्रवेश केला.

ख्रिस्तिना स्टेवार्ट हिने हा व्हिडीओ शेअर केला आहे. ती तेथून जात असताना तिला मगर जाळीवर चढून आता दिसली. तिने व्हिडीओ शेअर करताना फेसबूकवर लिहिले की, ‘मला आनंद आहे की, मी मगरीला अशाप्रकारे गेटवरून चढून जाताना बघितले.’

https://www.facebook.com/stinabear/videos/10205681431111646/

तिने व्हिडीओ पोस्ट केल्यानंतर आतापर्यंत अनेकांनी शेअर केला आहे. आतापर्यंत हा व्हिडीओ तब्बल 3 लाखांपेक्षा अधिक व्यक्तींनी बघितला आहे.

अनेकांनी कमेंट्स करत लिहिले की, हे भितीदायक आहे. तर एकाने लिहिले की, ‘जर तुम्ही फ्लोरिडामध्ये नवीन असाल अथवा अनेक वर्ष येथे नसाल तर एक गोष्ट लक्षात ठेवा की, जर तुम्हाला पाणी दिसले तर त्यात मगर नक्की आहे.’

Leave a Comment