चर्चेत आलेले समलैंगिक क्रिकेटपटू जोडपे होणार पालक


न्युझीलंडच्या महिला क्रिकेट संघाची कर्णधार एमी सँटर्थवेट लवकरच बाळाला जन्म देणार आहे. एमीने मार्च 2017 मध्ये आपल्या संघातील महिला क्रिकेटपटू ली तहुहु बरोबर लग्न केले होते. व्हाइट फर्न्सची कर्णधार असलेल्या एमीने आता क्रिकेटपासून ब्रेक घेतला आहे.

एमी आणि ली आपल्या बाळाला पुढील वर्षीच्या सुरूवातीला जन्म देईल. दोन्ही महिला क्रिकेटर नवीन पाहुण्याच्या स्वागतासाठी आताच तयारीला लागले आहेत. एमी सँटर्थवेटने अधिकृत सोशल मीडिया हँडलद्वारे या गोष्टीची माहिती दिली.

एमीने ट्विट करत लिहिले की, ली आणि मला तुम्हाला ही गोष्ट सांगण्यास खुप आनंद होत आहे की, नवीन वर्षात आम्ही आमच्या पहिल्या बाळाला जन्म देणार आहोत. या नवीन चँप्टरसाठी आम्ही किती उत्सुक आहोत, ते शब्दात सांगता येणार नाही.

एमी आणि ली दोघींनी मार्च 2017 मध्ये लग्न केले होते. दोघीही एकमेकींना 8 वर्षांपासून ओळखत होत्या. 2014 मध्ये त्यांनी साखरपूडा केला होता. एमीने सांगितले की, ती नशीबवान आहे की, परिवारासाठी क्रिकेटपासून ब्रेक घेण्यासाठी न्युझीलंड क्रिकेटने मदत केली.

एमीने सांगितले की, खेळाप्रती अजून बरचं काही बाकी आहे. तिचे लक्ष्य 2021 ला न्युझीलंडमध्ये होणाऱ्या आयसीसी महिला क्रिकेट विश्वचषकाकडे आहे. तसेच ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी20 वर्ल्ड कपमध्ये देखील ती सहभागी होणार नाही.

Leave a Comment