या शाळेत यंदा २५ जुळ्यांनी घेतला प्रवेश


स्कॉटीश कौन्सिल वेस्ट डन्बर्टशायर येथील एका शाळेत नवीन वर्ष सुरु होताच यंदा २५ जुळी मुले दाखल झाली आहेत. सोमवारी शाळा सुरु झाली तेव्हा शाळा व्यवस्थापनाने या नव्या विद्यार्थ्यांचे हार्दिक स्वागत केले. गतवर्षी या शाळेत १४ जुळी मुले दाखल झाली होती.

शिक्षण विभागाचे व्हाईस कन्व्हेअर इयान डिक्सन म्हणाले, उन्हाळा संपून आता शाळा पुन्हा सुरु झाल्या आहेत. सर्व विद्यार्थ्यांसाठी हा मोठा बदल असतो पण आमचे शिक्षक त्यांना पूर्ण सहकार्य करण्यास तयार आहेत. जुळी मुले एकत्र शिकणे हे रोमांचक असते याचा अनुभव आम्ही घेत आहोत. त्यांच्यात स्पर्धा असते पण आपले भावंड एखाद्या विषयात मागे पडतेय असे दिसले तर दुसरा लगेच त्याची मदत करतो. त्याला शिकवितो. पहिला दिवस मुले आणि पालक याच्यासाठी खास असतो पण हा दिवस सख्या भाऊ बहिणीसोबत शेअर करायला मिळाला तर तो अविस्मरणीय ठरतो.

Leave a Comment