साहोच्या प्री-रिलीज इव्हेंटवर एवढ्या कोटींचा खर्च


साहो या बहुचर्चित आणि बिग बजेट चित्रपटाचे नुकतेच प्री-रिलीज इव्हेंटचे आयोजन करण्यात आले होते. प्रभासच्या चाहत्यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी हैदराबादच्या रामोजी फिल्म सीटीमध्ये आयोजित या इव्हेंटला केली होती. तसेच ही संख्या लाखांच्या घरात होता.

श्रद्धा आणि प्रभाससह अनेक दाक्षिणात्य कलाकारांनी या इव्हेंटसाठी हजेरी लावली होती. साहोमध्ये वापरल्या गेलेल्या गाड्या, मशीन आणि गॅजेट यांचे प्रदर्शनही या प्री-रिलीज इव्हेंटमध्ये केले गेले. या प्रमोशनल इव्हेंटसाठी चित्रपटाच्या निर्मात्यांनी २.५ कोटींचा खर्च केला असल्याचे वृत्त आहे.

या कार्यक्रमाच्या निमित्ताने रामोजी फिल्म सिटीच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळच हा सेट उभारला गेला. प्रभासच्या लाखो चाहत्यांसोबत प्रभासचे खास मित्र असलेल्या एस एस राजामौली यांनीही याठिकाणी हजेरी लावली आहे. दरम्यान, हा चित्रपटा येत्या ३० ऑगस्टला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Leave a Comment