
आपल्या विनोदी टीकांसाठी बॉलिवूडचा डॅडी अर्थात आघाडीचा चित्रपट निर्माता आणि दिग्दर्शक करण जोहर प्रसिद्ध आहे. करण या टीकांमुळे सोशल मीडियावर अनेकदा ट्रोल होताना दिसतो आणि त्याला या ट्रोलर्सला सडेतोड उत्तर देणेही चांगलेच माहित आहे. अशात करणच्या एका उत्तराने ट्रोलरची पुन्हा एकदा बोलती बंदी झाली आहे.
समलैंगिक म्हणून हिणवणाऱ्याला करण जोहरने झापले
You absolutely orignal genius! Where have you been hiding all this while??? Thank you for existing and emerging as the most prolific voice on Twitter today!!! https://t.co/5lxcPMjVif
— Karan Johar (@karanjohar) August 18, 2019
करणचे समलैंगिक संबंध असल्याच्या बातम्या अनेकदा समोर येत असतात. त्यातच एका युजरने म्हटले, एक चित्रपट करण जोहरच्या आयुष्यावर काढायला हवा, ज्याचे नाव ‘करण जोहर – द गे’ असे असेल, करणनेही ट्रोलरच्या या ट्विटवर उत्तर दिले आहे. ज्यात त्याने ट्रोलरला शालीतून चांगलेच जोडे लगावले आहेत.
करण म्हणाला, खरंच… तु खूप हुशार आहेस, ऐवढे दिवस कुठे लपून बसला होतास तू ? ट्विटरवर आज सर्वाधिक अनुकूल मुद्दा मांडण्यासाठी धन्यवाद… ट्रोलरने करणच्या या उत्तरानंतर आपले ते ट्विट डिलीट केले आहे.
