अभिनेत्री लीझा हेडन देणार पुन्हा एकदा गोड बातमी


सध्या अभिनय क्षेत्रापासून बॉलिवूड अभिनेत्री लीझा हेडन चार हात लांबच आहे. पण ती सोशल मीडियाच्या माध्यमातून नेहमी आपल्या चाहत्यांच्या संपर्कात असते. लीझाने अलिकडेच एक फोटो शेअर करुन आपल्या चाहत्यांना एक गोड बातमी दिली आहे.

या फोटोद्वारे आपण दुसऱ्यांदा आई बनणार असल्याचे लीझाने सांगितले आहे. चाहत्यांनीही ‘बेबी बंप’सोबत असलेल्या तिच्या या फोटोवर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.

View this post on Instagram

Party of four on the way 🥳

A post shared by Lisa Lalvani (@lisahaydon) on


डिनो लालवानीसोबत लीझा २०१६च्या ऑक्टोबरमध्ये विवाहबंधनात अडकली होती. तिने २०१७ मध्ये मे महिन्यात पहिल्या मुलाला जन्म दिला. तिच्या पहिल्या मुलाचे जॅक असे नाव आहे.


लीझा आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर नेहमीच आपल्या पती आणि मुलासोबतचे अनेक फोटो पोस्ट करत असते. ती आता तिच्या दुसऱ्या बाळाच्या आगमनाची वाट पाहत आहे.

कंगना राणावतसोबत ‘क्विन’, ‘हाऊसफुल ३’, ‘ऐ दिल है मुश्किल’, यांसारख्या लीझाने चित्रपटांमध्ये बोल्ड भूमिका साकारल्या आहेत. आपल्या फिटनेसमुळे आणि बोल्डनेसमुळे ती सोशल मीडियावर नेहमी चर्चेत असते.

Leave a Comment