साहोचा ‘बॅड बॉय’ तुमच्या भेटीला


येत्या 30 ऑगस्टला गेल्या ब-याच दिवसांपासून चर्चेत असलेला साहो चित्रपट प्रदर्शित होणार असून या चित्रपटाद्वारे पहिल्यांदाच अभिनेता प्रभास आणि श्रद्धा कपूर स्क्रिन शेअर करणार आहेत. हा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच यातील अॅक्शन सीन्समुळे तसेच गाण्यांमुळे बराच चर्चेत येत आहे. आता नुकतेच या चित्रपटातील नवे गाणे रिलीज करण्यात आला आहे. या गाण्याचे बोल ‘बॅड बॉय’ असे असून प्रभाससोबत या गाण्यावर जॅकलिन फर्नांडिस थिरकताना दिसणार आहे.

खुद्द रॅपर बादशहाने हे गाणे गायले असून यात त्याला नीती मोहनने साथ दिली आहे. त्याचबरोबर या गाण्याचा बादशहाच गीतकार आणि संगीतकार आहे.अभिनेता नील नितिन मुकेश, जॅकी श्रॉफ, मंदिरा बेदी, महेश मांजरेकर आणि चंकी पांडे यांच्यासारखे कलाकार साहो चित्रपटात मुख्य भुमिका साकारताना दिसणार आहेत. यूवी क्रियेशन प्रोडक्शन आणि टी-सिरिज मिळून हा चित्रपट प्रदर्शित करणार आहेत. वामसी, प्रमोद आणि विक्रम यांनी मिळून या अॅक्शन थ्रिलर चित्रपटाची निर्मिती केली आहे. त्याचसोबत सुजीत यांनी चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे.

Leave a Comment