बोहल्यावर चढला हॉलिवूडचा सुपरस्टार ‘द रॉक’


अभिनेता व रेसलर ड्वेन जॉनसन अर्थात द रॉक हा हॉलीवूडसोबतच संपूर्ण जगात प्रसिद्ध आहे. पण त्याने नुकतीच आपली खूप काळापासूनची गर्लफ्रेंड लॉरेन हशियन हिच्यासोबत विवाह केला आहे. ही माहिती 47 वर्षीय रॉकने आपल्या इंस्टग्राम अकाऊंटवरून देत लग्नाचे काही खास फोटो शेअर केले आहेत. यानंतर काहीच अवधीत त्याच्या फॅन्सने हे फोटो तुफान व्हायरल करून आपला आनंद व्यक्त केला आहे.

त्याने ‘We Do’ असे कॅप्शन या फोटोखाली आहे तसेच यामध्ये लॉरेन ही ख्रिश्चिन पद्धतीच्या पांढऱ्या ब्रायडल गाऊन मध्ये दिसत आहेत, हे फोटो हवाई मधील असून १८ ऑगस्टला रॉकने हे फोटो शेअर केले आहेत. त्याची पत्नी लॉरेन ही एक प्रसिद्ध गायिका, संगीत निर्माती व गीतकार आहे.

रॉक आणि लॉरेन यांची भेट 2006 मध्ये झाली होती, पण रॉक हा तेव्हा आपल्या पहिल्या पत्नीसोबाबत होता. त्याने २००७ मध्ये पहिल्या पत्नीला घटस्फोट दिल्यानंतर त्यांच्यातील जवळीक वाढू लागली. आता रॉक आणि लॉरेन यांना दोन जस्मिन आणि तियाना नावाच्या दोन मुली सुद्धा आहेत. तब्बल १२ वर्षे एकत्र राहिल्यानंतर त्यांनी अखेरीस लग्न करण्याचा निर्णय घेतला.

Leave a Comment