भारतीय राष्ट्रध्वज पाकिस्तानात फडकला डौलाने


इस्लामाबाद – 73 व्या भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त काल पाकिस्तानातील भारतीय उच्च आयोगाच्या कार्यालयात मोठ्या उत्साहात तिरंगा फडकवण्यात आला आहे. भारतीय उच्चायुक्त अजय बिसारिया यांनी पाकिस्तानातील उच्च आयोगामध्ये भारतीय राष्ट्रध्वज फडकतच राहील, असे ट्विटरच्या माध्यमातून म्हटले आहे.


इस्लामाबाद येथील भारतीय उच्च आयोगाच्या कार्यालयात भारताच्या 73 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त भारतीय राष्ट्रध्वज फडकवण्यात आला. येथे खूप जास्त जोश आहे. जय हिंद, असे इस्लामाबादमधील भारतीय उच्चायुक्तांनी ट्विट केले आहे. यावेळी राष्ट्रध्वज फडकवून अधिकारी गौरव अहलुवालिया यांनी राष्ट्रपतींचा संदेश वाचला. पाकिस्तान जम्मू-काश्मीरमधील कलम ३७० रद्द केल्यानंतर सैरभैर झाला आहे. भारतीय उच्चायुक्त अजय बिसारिया यांना पाकिस्तानने परत पाठवले आहे. शिवाय त्यांचे भारतातील उच्चायुक्त मोईन उल हक्क यांना माघारी बोलावून घेतले आहे.

Leave a Comment