‘काळा दिवस’ साजरा करत आहेत इम्रान खान, ट्विटर खातेही केले काळे


इस्लामाबाद – भारत देशाने काल आपला 73 वा स्वातंत्र्य दिन मोठ्या दिमाखाने साजरा केला. पण दूसरीकडे भारताचा कट्टर शत्रू असलेल्या पाकिस्तानचे नापाक मनसुबे समोर आले आहेत. 15 ऑगस्ट हा भारताचा स्वातंत्र्य दिन पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान ‘काळा दिवस’ म्हणून साजरा करत आहेत. आपल्या टि्वटर खात्यावर त्यांनी प्रोफाईल फोटो ऐवजी काळा रंग भरला आहे.

भारताचा स्वातंत्र्य दिवस म्हणजेच 15 ऑगस्ट हा पाकिस्तानमध्ये दिवस काळा दिवस म्हणून जाहीर करण्यात आला आहे. पाकिस्तानातील सगळ्या प्रसारमाध्यमांना या संदर्भातल्या सूचना देण्यात आल्या आहेत. गुरुवारी ट्विट करुन काश्मीर मुद्यावर जगाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न इम्रान खान यांनी केला. काश्मीर प्रश्नाकडे जर गांभीर्याने पाहिले गेले नाही. तर काही घडत त्यावर जर मौन बाळगले तर त्यांचे गंभीर परिणाम भोगावे लागतील, असा इशारा त्यांनी आंतरराष्ट्रीय संघाला दिला.

Leave a Comment