छिछोरेंच्या ‘फिकर नॉट’ गाण्याचा टीझर रिलीज


लवकरच छिछोरे चित्रपटाच्या माध्यमातून आशिकी गर्ल श्रद्धा कपूर आणि सुशांत सिंह राजपूत यांची जोडी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. काही दिवसांपूर्वीच मैत्रीची व्याख्या सांगणाऱ्या या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज करण्यात आल्यानंतर आता चित्रपटातील पहिल्या गाण्याची झलक शेअर करण्यात आली आहे.

या गाण्याचे शीर्षक फिकर नॉट असे आहे. या गाण्याचा टीझर आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून श्रद्धाने शेअर केला आहे. तिने या टीझरला छिछोरे का कॉलेज अँथम आ रहा हैं, असे कॅप्शन दिले आहे. नितेश तिवारी यांचे दिग्दर्शन असलेल्या या चित्रपटात श्रद्धा आणि सुशांतशिवाय वरूण शर्मा, प्रतीक बब्बर आणि इतर कलाकारांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत.


३० ऑगस्टला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार होता. पण श्रद्धाच्याच साहोची रिलीज डेटही ३० ऑगस्टच जाहीर झाल्यानंतर नितेश तिवारी यांनी नाराजी व्यक्त करत छिछोरेचे प्रदर्शन पुढे ढकलले आणि हा चित्रपट आता ६ सप्टेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Leave a Comment