‘ड्रीम गर्ल’चे पहिले वहिले गाणे रिलीज


अभिनेता आयुष्मान खुराणा हा नेहमीच प्रेक्षकांच्या भेटीला आशय घेऊन येतो. त्यातच तो आता आणखी एका नव्या भूमिकेसाठी सज्ज झाला आहे. लवकरच तो ड्रीम गर्ल या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज करण्यात आला होता.

त्यानंतर चित्रपटातील पहिले गाणे आता नुकतेच रिलीज करण्यात आले आहे. आयुष्मान आणि नुशरत भरूचाच्या डान्सची झलक राधे राधे असे शीर्षक असलेल्या या गाण्यात पाहायला मिळत आहे. मित ब्रदर्स आणि अमित गुप्ता यांनी या गाण्याला आवाज दिला आहे.

अनू कपूर राज शाडिल्य यांचे दिग्दर्शन असलेल्या या चित्रपटात आयुष्मानच्या वडिलांच्या भूमिकेत दिसणार आहे. हा चित्रपट येत्या १३ सप्टेंबरला रिलीज होणार आहे. नुकतेच राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार पटकवलेल्या आयुष्मानला आता या नव्या भूमिकेत पाहण्यासाठी त्याचे चाहतेही आतुर आहेत.

Leave a Comment