तुम्ही पाहिला आहे का ‘सैरा’चा थक्क करणारा मेकिंग व्हिडिओ ?


कालच दाक्षिणात्य आणि बॉलिवूडमधील दिग्गज कलाकारांची फौज असलेल्या सैरा चित्रपटाच्या स्टारकास्टची घोषणा करण्यात आल्यानंतर पडद्यावर या कलाकारांना एकत्र पाहण्यासाठी चाहते आतुर असतानाच या चित्रपटाचा डोळ्यांची पारणे फेडणारा मेकिंग व्हिडिओ आता रिलीज करण्यात आला आहे.


सैरा नरसिम्हा रेड्डी चित्रपटाचा हा थरारक व्हिडिओ चित्रपटाबद्दलची प्रेक्षकांची उत्कंठा शिगेला पोहोचवणारा असून या व्हिडिओमध्ये बॉलिवूड महानायक अमिताभ बच्चन, कन्नड सुपरस्टार किच्चा सुदीप, विजय सेतुपती, नयनतारा, तमन्ना आणि रवी किशनसारख्या अनेक कलाकारांची झलक पाहायला मिळत आहे.

या चित्रपटाची कथा भारतीय स्वातंत्र्य लढ्यात ब्रिटीशांविरुध्द एल्गार पुकारणााऱ्या आंध्र प्रदेशातील एका स्वातंत्र्य सैनिकावर आधारित आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन सुरेंद्र रेड्डी यांनी केले असून या चित्रपटाचा राम चरण निर्माता आहे. हा चित्रपट हिंदीसह दाक्षिणात्य भाषांमध्ये रिलीज होणार. रितेश सिध्दवानी आणि फरहान अख्तर या चित्रपटाचे हिंदीमध्ये वितरण करणार आहेत.

Leave a Comment