बॉलिवूडमधील या सावत्र भावा-बहिणींचे नाते आहे खास


आज देशभरात स्वातंत्र्य दिनासोबतच रक्षाबंधन देखील साजरी केली जात आहे. बहिणी भावाच्या हातावर राखी बांधत आहेत तर भाऊ त्यांची रक्षा करण्याचे वचन देत आहेत. रक्षा बंधनाचा हा सण, बॉलिवूडमधील कलाकार देखील मोठ्या उत्साहाने साजरा करतात. याच निमित्ताने जाणून घेऊया बॉलिवूडमधील भावा-बहिणीच्या नात्याबद्दल.

सारा अली खान – तैमूर अली खान
सारा ही सैफ अली खान आणि अमृता सिंह यांची मुलगी आहे. तर तैमूर सैफ आणि करीना कपूर यांचा मुलगा आहे. सारा तैमूरवर खूप प्रेम करते. मागील वर्षी रक्षा बंधनला त्यांचा फोटो खूप व्हायरल झाला होता.

अर्जुन कपूर – जान्हवी कपूर
अर्जुन आणि अंशुला हे बोनी कपूर आणि मोना कपूरचे मुले आहेत तर जान्हवी आणि खुशी हे बोनी कपूर आणि श्रीदेवीच्या मुली आहेत. श्रीदेवी यांच्या निधनानंतर अर्जुन कपूर आल्या सावत्र बहिणींच्या खूपच जवळ आला आहे. अर्जुन आता अंशुलाप्रमाणेच जान्हवी आणि खुशीची मोठ्या भावाप्रमाणे काळजी घेतो.

सनी देओल – एशा देशोल
सनी देओल, बॉबी देओल, अजीता आणि विजेयता हे धर्मेंद्रची पहिली पत्नी प्रकाश कौर यांची मुले आहेत. तर एशा देओल आणि आहना देओल, हेमा मालिनी आणि धर्मेंद्र यांची मुले आहेत. सनी आणि बॉबीला आपल्या सावत्र बहिणींबरोबर खूप कमी वेळा दिसतात.

प्रतिक बब्बर – जूही बब्बर
प्रतिक, राज बब्बर आणि स्मिता पाटील यांचा मुलगा आहे. तर जूही आणि आर्यन, राज आणि नंदिराची मुलं आहेत. अनेकवेळा हे भाऊ-बहिण एकत्र दिसतात.

त्रिशाला दत्त – शाहरान
त्रिशाला, संजय दत्तची पहिली पत्नी ऋचा शर्माची मुलगी आहे. तर संजय दत्त आणि मान्यता दत्त यांना शाहरान आणि इकरा हे दोन मुले आहेत. त्रिशाला न्युयॉर्कमध्ये आपल्या आजी-आजोबा राहत असतात. खूप कमी वेळा हे भाऊ-बहिण दोघे एकत्र दिसतात.

Leave a Comment