एकाच चित्रपटात पहायला मिळणार दाक्षिणात्य आणि बॉलिवूड सुपरस्टार


एकाच चित्रपटात दाक्षिणात्य आणि बॉलिवूड सुपरस्टार यांना पाहण्याची अनोखी पर्वणी सिने रसिकांना मिळणार आहे. या ऐतिहासिक चित्रपटाचे शीर्षक सैरा नरसिम्हा रेड्डी असे आहे. या चित्रपटाचा मेकिंग व्हिडिओ स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला रिलीज केला जाणार आहे. हिंदीसह दाक्षिणात्य भाषांमध्ये हा चित्रपट रिलीज होईल. तर या चित्रपटाचे हिंदीमध्ये वितरण रितेश सिध्दवानी आणि फरहान अख्तर करणार आहेत.


चित्रपटाची कथा आंध्र प्रदेशातील एका लढाऊ योद्ध्यावर आधारित आहे. भारतीय स्वातंत्र्य लढ्यात ब्रिटीशांविरुध्द एल्गार पुकारणाऱ्या स्वातंत्र्य सैनिकाची ही सत्यकथा आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन सुरेंद्र रेड्डी यांनी केले असून या चित्रपटाचा राम चरण निर्माता आहे.


शूटींग गेली ३ वर्षे या चित्रपटाचे सुरू होते. हा एक बिग बजेट चित्रपट असून यातील फाईटच्या एका सीनसाठी तब्बल ४५ कोटी रुपये खर्च झाला आहे. यावरुन चित्रपटासाठी किती मेहनत घेतली जात आहे याचा अंदाज येऊ शकतो.


जून महिन्यात या चित्रपटाचे शूटींग पूर्ण झाले. चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख अद्याप जाहीर झालेली नसली तरी नियोजनबध्दपध्दतीने याचे प्रमोशन सुरू आहे. या चित्रपटाचा मेकिंग व्हिडिओ संध्याकाळी रिलीज होईल. सुपरस्टार चिरंजीवी, के. सुदिप, विजय सेतुपती, जगपतीबाबू, नयनतारा, तमन्ना आणि अनुष्का शेट्टी यांच्या यात प्रमुख भूमिका आहेत. अमिताभ बच्चन यांची यात विशेष भूमिका असेल.

Leave a Comment