धक्कादायक खुलासा! पाकिस्तानने रचला होता अभिनंदन यांच्या हत्येचा कट


नवी दिल्ली : एरियल स्ट्राईकनंतर बिथरलेल्या पाकिस्तानच्या एफ-16 लढाऊ विमानांनी भारतीय हद्दीत घुसखोरी केली होती. हवाईदलाच्या मिग-21 बायसन विमानाने यावेळेस पाकिस्तानचे एफ-16 विमान पाडले. अभिनंदन वर्थमान यांचे मिग-21 विमान पाकिस्तानच्या एफ-16 लढाऊ विमानाचा पाठलाग करताना चुकून पाकिस्तानच्या हद्दीत शिरल्यानंतरही अभिनंदन हे सुरक्षित भारतात परत येऊ शकत होते. पण त्यांना ते पाकिस्तानच्या कारस्थानामुळे शक्य झाले नाही.

आपल्या भारतीय सैनिकाला आपल्या हद्दीमध्ये शिरल्यानंतर पाकिस्तान मारण्याच्या तयारीत होता. पण ते त्यांना जमले नाही. पाकच्या हद्दीत अभिनंदन हे शिरताच त्यांना परत येण्याची सूचना देण्यात आली होती. पण पाकिस्तानकडून त्यांच्या कम्युनिकेशन सिस्टमलाच जाम करण्यात आल्यामुळे अभिनंदन यांना वॉर रुममधून आलेल्या सूचना ऐकू गेल्या नाही आणि त्यांना पाकिस्तानच्या हद्दीत उतरावे लागले.

यासंदर्भातील वृत्त ‘हिन्दुस्तान टाइम्स’ने प्रसिद्ध केले असून त्यांनी दिलेल्या वृत्तानुसार, अँटी जॅमिंग टेकनिक विंग कमांडर अभिनंदन यांच्या मिग-21 (MiG-21)मध्ये असती तर त्यांच्यापर्यंत सूचना पोहचल्या असत्या आणि ते भारतात परत आले असते. पण पाकिस्तानने यातच रडीचा डाव खेळत अभिनंदन यांच्या विमानाची कम्यूनिकेशन सिस्टम जाम केली आणि त्यांना पाकिस्तानध्ये उतरण्यास भाग पाडले.

Leave a Comment