OMG!!! रिलीज आधीच प्रभासच्या साहोने कमावले 320 कोटी


आगामी साहो या चित्रपटामुळे प्रभासचे चाहते कमालीचे उत्सुक असल्याचे चित्र सध्या दिसत आहे. या महिन्याच्या 30 तारखेला साहो प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यासंदर्भात आजतक या वृत्त वाहिनीने दिलेल्या वृत्तानुसार रिलीज आधीच 320 कोटींची कमाई बिग बजेट असलेल्या साहोने केली आहे. आजतकच्या वृत्तानुसार निर्मात्यांनी 320 कोटींना साहोचे थियेट्रिकल राईट्स विकले आहेत. त्याचबरोबर निर्मात्यांनी साहोचे सेटलाईट राईट्स विकलेले नाहीत. साहो हा बाहुबलीनंतरचा प्रभासचा पहिला चित्रपट असल्यामुळे त्याचे चाहते या चित्रपटाची मोठ्या आतुरतेने वाट पाहत आहेत.

प्रभास आणि श्रद्धा सध्या साहोच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहेत 2019 मधील सर्वात बिग बजेट चित्रपट म्हणून साहोकडे पाहिले जात आहे. प्रभास आणि श्रद्धा कपूरने या चित्रपटात काम करण्यासाठी भलीमोठी रक्कम आकारली आहे. रिपोर्टनुसार प्रभासने 100 कोटींचे मानधन घेतल्याची माहिती आहे. या मानधनासोबत प्रभास फिल्म इंडस्ट्रीमधील सगळ्यात महागडा स्टार बनला आहे.


चित्रपटात प्रभासचे दमदार अॅक्शन सीन्स बघायला मिळणार आहेत. जवळपास 70 कोटींचा खर्च एक अॅक्शन शूट करण्यासाठी करण्यात आला आहे. आपल्या या चित्रपटासाठी प्रभासने चांगलीच मेहनत घेतली आहे. दिग्दर्शक सुजीत यांनीही प्रत्येक अ‍ॅक्शन सीनकडे बारकाईने लक्ष दिले आहे. प्रभास प्रत्येक सीनमध्ये अतिशय प्रभावशाली दिसला पाहिजे यासाठी ते प्रयत्न करत आहेत. साहो हा चित्रपट आपल्या देशातील भारतातील पहिला बहुभाषी चित्रपट असून एकाच वेळी हिंदी, तेलगू आणि तमिळ या भाषांमध्ये हा शूट केला गेला आहे.

Leave a Comment