अरे देवा…! हे काय केले इंग्लंडच्या महिला क्रिकेटपटूने


लंडन – इंग्लंडच्या महिला क्रिकेट संघाची सारा जेन टेलर ही मोठी खेळाडू म्हणून ओळखली जाते. ती संघामध्ये यष्टीरक्षक-फलंदाज म्हणून जबाबदारी सांभाळते. पण सारा सध्या तिच्या क्रिकेटमुळे नाही तर, एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आली आहे.

आपल्या इन्स्टाग्रामवरुन इंग्लंडच्या या क्रिकेटपटूने एक न्यूड फोटो शेअर केला आहे. सोशल मीडियावर सध्या या पोस्टने धुमाकूळ घातला आहे. सध्या जगभरात सुरू असलेल्या महिलांच्या आरोग्यविषयक अभियानांची कामे सारा पाहते. तिने त्याचाच एक भाग म्हणून इन्स्टाग्रामवर हा फोटो शेअर केला आहे.

या फोटोच्या कॅप्शनमध्ये एक संदेश साराने दिला आहे. ती म्हणाली, मला हा न्यूड फोटो काढताना आरामदायी वाटत नव्हते. मला तरीही अभिमान वाटत आहे. कारण, या womenshealthuk अभियानात मी सहभागी झाले. माझ्या शरीराच्या बाबतीत मला नेहमीच काही समस्या जाणवल्या आहेत. मी त्यासाठीच या अभियानात भाग घेतला.

सारा पुढे म्हणाली, आपल्या शरीराचा प्रत्येक महिलेला अभिमान असायला हवा. प्रत्येक मुलगी सुंदर दिसते आणि लक्षात ठेवा प्रत्येक महिला सुंदर असते. या कॅप्शनच्या शेवटी साराने या अभियानात सहभागी होणाऱ्या सर्व लोकांचे आभार मानले आहेत.

Leave a Comment