आनंद महिंद्रांना का आवडला हा व्हायरल व्हिडीओ


उद्योगपती आनंद महिंद्रा हे दररोज सकाळचा नित्यक्रम अर्था रूटीन बदलणार आहेत. हे देखील सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या एका व्हिडीओमुळे करणार आहेत.

महिंद्रा ग्रुपचे चेअरमन आनंद महिंद्रा यांनी ट्विटरवर एक व्हिडीओ शेअर केला. या व्हिडीओमध्ये इराण मधील जिममध्ये चक्क तामिळ गाण्यावर लोक नाचत आहेत. तामिळ चित्रपट पोखिरीमधील म्मबाझिम्म या गाण्यावर जिममध्ये लोक नाचत आहेत.

ट्विटरवर शेअर केलेला हा व्हिडीओ आनंद महिंद्रा यांना खुपच आवडला. व्हिडीओ शेअर करत त्यांनी लिहिले की, खुपचं आवडलं. आता मी हा माझा रोज सकाळचा नित्यक्रम करणार आहे. बेडवरून उठायचे, तामिळ म्युझिक लावून त्याच्यावर नाचत दिवसाची सुरूवात करायची.

आनंद महिंद्रा यांनी हा व्हिडीओ शेअर केल्यानंतर त्यांच्या फॉलोवर्सने देखील पोस्टवर कमेंट्सचा वर्षावच केला.

Leave a Comment