बापरे ! हे कुटुंबिय प्रत्येक मिनिटाला कमवतात कोट्यावधी रूपये


ब्लुमबर्गद्वारा जगातील सर्वाधिक श्रींमत कुटुंबाची यादी जाहीर करण्यात आली असून, या कुटूंबाच्या संपत्तीमध्ये प्रत्येक मिनिटाला करोडो रूपयांची वाढत होत आहे

ब्लुमबर्गनुसार, रिटेल चेन वॉलमार्ट कंपनी संचलित करणारे वॉल्टन कुटूंब या यादीत पहिल्या स्थानावर आहे. वॉल्टन यांच्या कुटूंबाची एकूण संपत्ती 13.5 लाख करोड़ रुपये आहे. या कुटुंबाच्या संपत्तीत प्रत्येक मिनिटाला 46 लाख रूपये, दर तासाला 28 करोड रूपये आणि दर दिवसाला 672 करोड रूपयांची वाढ होत आहे.

जगातील सर्वाधिक श्रींमत कुटुंबाच्या संपत्तीमध्ये 2018 मध्ये 2.7 लाख करोड़ रुपयांची वाढ झाली आहे. 1929 मध्ये अमेरिकेकडे असलेल्या संपत्ती एवढी संपत्ती सध्या 0.1 टक्के लोकांच्या ताब्यात आहे.

या यादीमध्ये भारतीय उद्योगपती मुकेश अंबानी यांचे कुटुंब नवव्या स्थानावर आहे. अंबानी कुटुंबाची सध्या एकूण संपत्ती 3.5 लाख करोड रूपये आहे.

एवढ्या जल्दरित्या पैसे कमवणाऱ्या कुटुंबामध्ये केवळ वॉलमार्ट कुटुंबच नाही तर अन्य कुटुंब देखील आहेत. मार्स कुटुंब या यादीमध्ये दुसऱ्या स्थानावर असून, त्यांची एकूण संपत्ती 9 लाख करोड रूपये एवढी आहे. तर तिसऱ्या स्थानावर असणाऱ्या कोच या कुटुंबाची संपत्ती 8.84 लाख करोड रूपये एवढी आहे.

या आकडेवारीनुसार, 25 श्रींमत कुटुंबांच्या संपत्तीमध्ये मागील वर्षीच्या तुलनेत 250 बिलियन डॉलरने वाढ झाली आहे. यानुसार या 25 कुटूंबांकडे जगातील 99 लाख करोड रूपयांची संपत्ती आहे.
जगातील टॉप-10 श्रींमत कुटुंब –

  • वॉल्टन – 13.5 लाख करोड रूपये
  • मार्स – 9.00 लाख करोड रूपये
  • कोश – 8.84 लाख करोड रूपये
  • अल सऊद – 7.10 लाख करोड रूपये
  • वर्थिमर – 4.09 लाख करोड रूपये
  • हार्मेस – 3.77 लाख करोड रूपये
  • वान डैम – 3.75 लाख करोड रूपये
  • बोहेरिंगर – 3.60 लाख करोड रूपये
  • अंबानी – 3.58 लाख करोड रूपये
  • मैकमिलन  – 3.04 लाख करोड रूपये
  • Leave a Comment