या मुलाचा डान्स बघून तुम्ही हसू रोखू शकणार नाही

सोशल मीडियावर तुम्ही अनेक प्रकारचे व्हिडीओ पाहिले असतील. मात्र आज आम्ही तुम्हाला असा व्हिडीओ दाखवणार आहोत, जो बघून तुम्ही तुमचे हसू रोखू शकणार नाहीत. एवढेच नाही तर हा व्हिडीओ तुम्हाला तुमच्या लहानपणीची आठवण करून देईल.

उद्योगपती आनंद महिंद्रा हे देखील हा व्हिडीओ शेअर करण्यापासून स्वतःला थांबवू शकले नाहीत. या व्हायरल व्हिडीओमध्ये एक छोटा मुलगा गाडीच्या सिक्युरिटी सायरनच्या आवाजावर मस्तीमध्ये नाचताना दिसत आहे. अनेकदा मुलं किंवा वयोवृध्द सायरनच्या आवाजाने वैतागता. मात्र व्हिडीओमध्ये दिसते की, कसे आधी मुलाने बाईकला लाथ मारत सायरन वाजवले व सायरन वाजू लागताच तो खुश होऊन तेथेच डान्स करू लागतो. डान्स करत असताना तो अनेक वेगवेगळ्या प्रकारचे स्टेप्स करताना दिसत आहे. मात्र आईने ओरडताच तो जमीनीवर ठेवलेले सामान घेऊन घरात पळतो.

या लहान मुलाचा व्हिडीओ उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी शेअर केला. शेअर करताना त्यांनी लिहिले की, मी एवढी भारी गोष्ट खुप दिवसांनी बघितली. मी आताही पोट धरून हसत आहे. माझ्या विकेंडची सुरूवात झाली आहे.

35 सेंकदांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून, आतापर्यंत या व्हिडीओला 70 हजार पेक्षा अधिक लोकांनी बघितले आहे.

Leave a Comment