टिकटॉकचे हे टॉप-10 व्हिडीओ नक्की बघा


टिकटॉक सध्या लहानांपासून ते मोठ्यापर्यंत सर्वांमध्येच जोरदार चर्चा आहे. टिकटॉकचे व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असतात. असेच टिकटॉकचे व्हायरल झालेले टॉप-10 व्हिडीओ आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत.

भावा-बहिणीची डब्ल्यूडब्ल्यूई फाइट  –
टिकटॉकवर हा व्हिडीओ लोकांना मोठ्या प्रमाणात आवडत आहे. या व्हिडीओमध्ये दिसते की, बहिण आपल्या भावाला लाथा मारत आहे आणि पिन डाउन करत आहे.

इंजिनिअरचा नवीन अविष्कार –
या व्हिडीओमध्ये दिसते की, एका इंजिनिअरने अशी सायकल बनवली आहे जे एकदमे हटके आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान शेअर केला जात आहे.

पत्त्यांची जादू –
या व्हिडीओमध्ये मुलगी पत्ते पसरवते व चार भागात त्यांची विभागणी करते. त्यानंतर सुरूवातीचे चारही पत्ते एक्के निघतात.

बॉयफ्रेंडला टच केल्यावर गर्लफ्रेंडने केले हे काम –
या व्हिडीओमध्ये विराट कोहलीचे डुप्लीकेट दिसत आहे. बँकग्राउंडमध्ये बादशाहाचे गाणे सुरू असून, दुसरी मुलगी मुलाला हात लावल्यावर त्याची गर्लफ्रेंड त्या मुलीला मारू लागते.

मुलीचे क्युट एक्सप्रेशन –
या व्हिडीओमध्ये मुलगी कभी खुशी कभी गम मधील गाणे दीवाना है देखो गाण्यावर एक्सप्रेशन देत आहे. मुलीच्या या क्युट एक्सप्रेशनने हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात शेअर केला जात आहे.

आई अँक्टिंग करते तेव्हा –
हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. व्हिडीओमध्ये दिसते की, एक महिला कँमेऱ्यावर अँक्टिंग करत आहे आणि त्याचवेळी मुलगी मधे येते.

कुत्रा नाचू लागतो –
सोशल मीडियावर या व्हिडीओची मोठ्या प्रमाणात क्रेज आहे. या व्हिडीओमध्ये दिसते की, एक व्यक्ती एका हातात जेवण घेऊन उभा आहे व त्यासाठी कुत्रा मालकाला बघून डान्स करत आहे. डान्स केल्यानंतर ती व्यक्ती कुत्र्याला खायला देते.

100 रूपयाच्या नोटेसाठी मित्रांमध्ये भांडण –
या व्हिडीओमध्ये दिसते की, मित्रांचा एक ग्रुप उभा आहे. मुलीच्या खिश्यातून 100 रूपये पडतात. मुलगा ते पाहून 100 रूपयाच्या नोटेवर पाय ठेवतो. सगळे गेल्यानंतर मुलगा पैसे घेण्यासाठी खाली वाकल्यावर काय होते ते तुम्हीच बघा.

कपड्यांसाठी बहिणीवर प्रेम –
या व्हिडीओमध्ये दिसते की, एक कपल्स मॉलमध्ये फिरत आहे. त्यांच्याबरोबर मुलीची बहिण देखील आहे. ती मुलगी जेथे बसते तेथे आधी येऊन मुलगी जमीन साफ करते. हे पाहून मुलगा विचारतो की, तुझी बहिण तुझ्यावर किती प्रेम करते.. त्यावर मुलगी काय उत्तर देते ते तुम्हीच पाहा.

मलिंगा स्टाईल गोलंदाजी –
या व्हिडीओमध्ये दिसते की, एक जण गोलंदाजी करण्यासाठी येतो आणि मलिंगाप्रमाणे गोलंदाजी करण्याचा प्रयत्न करत असताना अंपायरचे डोकेच फोडतो.

Leave a Comment