
गुगलला टक्कर देणार हुवाईचे नवे ऑपरेटिंग सिस्टम
प्रसिध्द स्मार्टफोन कंपनी ह्युएईने आपल्या वार्षिक डेव्हलपर काँन्फरंसमध्ये हारमोनी (HarmonyOS) ऑपरेटिंग सिस्टम लाँच केली आहे. सीईओ रिचर्ड यु के यांच्यानुसार, कंपनी या नवीन ऑपरेटिंग सिस्टमवर 2017 पासून काम करत आहे. या नवीन प्रोडक्टला हॉनर डिव्हाईसच्या अंतर्गत सादर केले जाईल. नवीन ऑपरेटिंगद्वारे ह्युएईचे लक्ष्य ओपन सोर्स प्लँटफार्म उपलब्ध करून देणे हे आहे. ही सिस्टमस्मार्टफोनबरोबरच टिव्ही, लँपटॉप, आणि कारमध्ये देखील वापरण्यात येणार आहे.
हारमोनी ओएस कंपनीचे नवीन ओएस मायक्रोक्रेनेल (MicroKernel) वर आधारित आहे. ऑपरेटिंग सिस्टमचा स्पीड अधिक राहण्यास याची मदत होईल. हे ओपन सोर्स असून, सर्व डिव्हाईसच्या सिक्युरिटीसाठी ट्रस्टेड एक्सेक्यूटिव एनवायरनमेंट देखील त्यात असेल. हारमोनी ओएसमध्ये आर्क कम्पाइलर आहे. जे C/, C++, Java, JavaScript आणि Kotlin सारख्या सर्व भाषा सपोर्ट करते. रिचर्ड म्हणाले की, हारमोनीओएस अँड्राइडला रिप्लेस करू शकते. मात्र कंपनी सध्या युजर्ससाठी गुगलच्या अप पोर्टफोलियोसाठी स्मार्टफोन्समध्ये गुगल सॉफ्टवेअरचाच वापर करेल.
#HarmonyOS is built with a deterministic latency engine that gives a smooth interactive experience. That means latency is at a minimum; bringing fluid interactive experience to the maximum #HDC2019 pic.twitter.com/p9bnwNHJq6
— Huawei Mobile (@HuaweiMobile) August 9, 2019
जर युजर्सला काही अडचणी आल्या तर ते नवीन ऑपरेटिंग सिस्टममध्ये बदल करू शकतात. अप सपोर्टमध्ये हारमोनी ओएस अँड्राइडबरोबर एचटीएमएल5 आणि लिनक्स देखील सपोर्ट करेल. हारमोनी ओएसचे लक्ष्य अँड्राइडला मागे टाकत भविष्यात ग्लोबल ऑपरेटिंग सिस्टिम बनने हे आहे. ह्युएई आपल्या भागीदारांना डेव किट्स (Dev Kits) उपलब्ध करून देणार आहे. त्यामुळे अँप्स बनवण्यास लगेच सुरूवात केली जाईल व नवीन ऑपरेटिंग सिस्टमला लागू करण्याचे काम देखील जलद होईल.
