भंगारात जाऊ नये म्हणून, चक्क रेल्वेच्या डब्ब्यालाच बनवले ऑफिस


दिल्लीच्या चाणक्यपुरी येथील रेल्वे आधिकाऱ्यांनी रेल्वेच्या जुन्या डब्ब्याला थेट ऑफिसमध्ये बदलले आहे. हे ऑफिस 25 वर्ष जुने दोन डब्ब्यांना मिळवून बनवण्यात आले आहे. या ऑफिसचे आतील इंटिरियर अतिशय सुंदर असून, आता हे नँशनल रेल म्युझियमचे नवीन ऑफिस आहे.

म्युझियमचे संपुर्ण प्रशासकिय विभाग येथे बसूनच काम करते. म्युझियमचे डायरेक्टर देखील याच ऑफिसमध्ये बसतात. याच बरोबर यामध्ये विजिटर रूम देखील आहेत.
म्युझियमचे डायरेक्टर अमित सोराष्ट्री सांगतात की, जुन्या ऑफिसमध्ये छोट्या रूम होत्या. पुर्ण स्टाफ वेगवेगळे बसून काम करत असे. आता या नवीन कोचमध्ये सर्वजण एकसोबत बसून काम करतात. या डब्ब्यांना ऑफिसमध्ये परिवर्तन करण्याचे कारण हे डब्बे भंगारामध्ये न जाता याचा पुन्हा वापर करणे हेच होते.

सोराष्ट्री यांनी सांगितले की, हा प्लँन रेल्वे बोर्डाचे माजी चेअरमन अश्विनी लोहानी यांचा होता. रेल्वेच्या हे डब्बे 25 वर्ष वापर केल्यानंतर असेच पडून होते. हे ऑफिस सुंदर असण्याबरोबरच अतिशय स्वस्तात बनले आहे.