कपिल देव यांच्यासोबत करिना कपूरने मांडला डाव…


सध्या रिअॅलिटी शो ‘डान्स इंडिया डान्स ७’ मध्ये परिक्षक म्हणून बॉलिवूडची ‘बेबो’ अर्थात करिना कपूर दिसत आहे. भारतीय क्रिकेट टीमचे माजी कर्णधार कपिल देव नुकतेच ‘डान्स इंडिया डान्स ७’च्या सेटवर पाहुणे म्हणून पोहचले होते. कपिल देव ‘डान्स इंडिया डान्स ७’च्या सेटवर संपूर्ण टीमसोबत मज्जा-मस्ती करताना पाहायला मिळाले.

दरम्यान सोशल मीडियात या शोमधील एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. करिना कपूरसह कपिल देव या व्हिडिओमध्ये क्रिकेट खेळताना दिसत आहेत. ‘झी५’ने ट्विटरवरुन करिना आणि कपिल देव यांचा हा व्हिडिओ शेअर केला आहे.


कपिल देव आणि करिना व्हिडिओमध्ये एकमेकांसाठी बॉलिंग करताना दिसत आहेत. करिना आणि कपिल देव यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. करिनाला तिच्या मुलाचे नाव एका बॅटवर सही करुन कपिल देव देतात. याबाबत आनंद व्यक्त करत, करिनाने माझ्या मुलाने क्रिकेटर बनावे अशी इच्छाही व्यक्त केली. मला कपिल देव यांनी हे सर्वात मोठे गिफ्ट दिले असल्याची भावनाही करिनाने व्यक्त केली.

Leave a Comment