कंबरदुखी कमी होण्यासाठी आजमावून पहा हे उपाय


आजच्या जीवनशैलीमध्ये व्यायामाचा अभाव, संगणकासमोर सलग अनेक तास बसून काम करणे, चुकीचे पोश्चर, यामुळे कंबरदुखीने अनेक जण त्रस्त असतात. तसेच अनेकांना अकस्मात झालेली इजा, महिलांच्या बाबतीत बोलायचे झाले, तर नुकतीच झालेली प्रसूती, शारीरिक श्रमाचा ताण, मासिक धर्माच्या वेळी होणारी कंबरदुखी या समस्या पहावयास मिळतात. अश्या प्रकारची कंबरदुखी कमी करण्यासाठी काही सोप्या उपायांचा अवलंब करता येऊ शकेल.

अनेकदा कंबरदुखी ही व्यायामाच्या अभावामुळेही सुरु होत असते. शरीराला आणि पाठीच्या स्नायूंना ताण बसेल इतपत व्यायाम यासाठी करणे आवश्यक आहे. यासाठी चालणे, जाणकार मंडळींच्या देखरेखीखाली केलेले व्यायामप्रकार, योगासने यांचा कंबरदुखी कमी करण्यासाठी नक्कीच फायदा होऊ शकतो. अश्या प्रकारच्या व्यायामामुळे शरीरात एंडोर्फीनचा स्राव सक्रीय होतो. एंडोर्फिन वेदनाशामक असल्याने कंबरदुखी कमी होण्यास हलका फुलका व्यायाम नक्कीच सहायक ठरू शकतो.

अनेकदा हलक्या मालिशने ही कंबरदुखीमध्ये आराम मिळतो. तत्पूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. सतत बसून काम केल्यानेही कंबरदुखी सुरु होते. अश्या वेळी आपल्या बसण्याचे पोश्चर योग्य आहे किंवा नाही हे पाहणे महत्वाचे ठरते. खुर्चीवर बसून काम करताना आपल्या पाठीच्या कण्याला आधार मिळेल आणि मान कायम झुकलेली असणार नाही, किंवा त्यावर कोणताही ताण पडणार नाही, याची काळजी घेणे आवश्यक आहे. कंबरदुखी फारच त्रासदायक ठरत असेल, कंबरेवर सूज जाणवत असेल, तर सूज कमी करण्यासाठी आईसपॅकचा वापर करावा. सूज उतरल्यानंतर वेदना कमी करण्यासाठी गरम पाण्याच्या पिशवीने शेक घ्यावा. स्नान करण्याच्या गरम पाण्यामध्ये निलगिरीच्या तेलाचे काही थेंब टाकून या पाण्याने स्नान केले असताही कंबरदुखीमध्ये आराम पडतो.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment