कंगणाच्या ‘धाकड’चा फर्स्ट लूक टीझर रिलीज


‘जजमेंटल है क्या’ चित्रपटानंतर आता ‘धाकड’ चित्रपटासाठी बॉलीवूडची क्वीन अर्थात अभिनेत्री कंगना राणावत सज्ज झाली असून तिच्या सायको थ्रिलर असलेल्या ‘जजमेंटल है क्या’ चित्रपटातील भूमिकेचे सर्वांनी प्रशंसा केली. आपल्या भूमिकेत नवनवीन प्रयोग करायला कंगनाला आवडतात. त्यामुळे ती आता पुन्हा एकदा अनोख्या अंदाजात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

काही महिन्यांपूर्वीच कंगनाच्या आगामी ‘धाकड’ चित्रपटाची घोषणा करण्यात आली होती. प्रेक्षकांना या चित्रपटाचे फर्स्ट लूक पोस्टरही पाहायला मिळाले. कंगनाचा जबरदस्त लूक पोस्टरमध्ये पाहायला मिळाला होता. या चित्रपटाचा फर्स्ट लूक टीझर आता रिलीज करण्यात आला आहे. हा टीजर पाहून तुमच्याही अंगावर काटा येईल.

‘धाकड’ हा चित्रपट अॅक्शनपट असणार आहे. रेजी घई हे या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहेत. ‘गन फु’, मार्शल आर्ट्स आणि बंदुकीचे काही अॅक्शनने भरलेला हा चित्रपट असणार आहे. या टीझरबद्दल सांगताना कंगनाने म्हटले होते, की माझ्या हाती टीझरमध्ये असलेली बंदुक ही खरी होती. ती खूप जड असल्यामुळे ती उचलायला मला फार मेहनत करावी लागली. चित्रपटाचे बरेचसे शूटिंग पूर्ण झाले आहे. हा चित्रपट पुढच्या वर्षी रिलीज होणार आहे.

Leave a Comment