पूरस्थिती पाहण्यासाठी गेलेल्या भाजप नेत्यांवर राज ठाकरेंची टीका


मुंबई – मुख्यमंत्री दवेंद्र फडणवीस सांगली, कोल्हापूरमधील पूरस्थिती पाहण्यासाठी हेलिकॉप्टरमधून फिरतात. पुरात जाऊन त्यांच्या सरकारमधील मंत्री सेल्फी काढतात. या सरकारच्या मंत्र्यांना माज आला आहे. आता जनतेची भिती या मंत्र्यांना राहलेली नाही, अशी टीका मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाजपवर केली. मुंबईत आज मनसेचा पदाधिकारी मेळावा आयोजित केला होता. यावेळी राज ठाकरे बोलत होते.

भारताला युएपीए कायद्याची गरज नव्हती. पण हा कायदा करण्यात आल्यामुळे एका व्यक्तीवर संशय आला तरी त्याला दहशतवादी ठरवले जाईल. तुरुंगात कुणाला पाठवायचे, कुणाला दहशतवादी ठरवायचे याचा अधिकारी फक्त अमित शहा यांनाच असेल, असे राज ठाकरे यावेळी म्हणाले.

देशाची परिस्थिती आज डबघाईला आली आहे. कारखाने बंद होत आहेत. जेट एअरवेज बंद पडल्यामुळे हजारो कर्मचारी बरोजगार झाले आहे. त्याचबरोबर बीएसएनएलचे कर्मचारी बेरोजगार झाले आहे. पुढील काळात १० लाख लोक बेरोजगार होतील. तसेच गेल्या ४५ वर्षातील उच्चांकी बेरोजगारी भारतात असल्याचे राज ठाकरे म्हणाले.

फारुख अब्दुला आणि मेहबुबा मुफ्ती यांच्यावर कारवाई भाजपला हवी होती, तर त्यांच्यापर्यंत ती मर्यादित करायला पाहीजे होती. पण काश्मिरचे विभाजन केले. उद्या काश्मिरसारखी विदर्भ आणि मुंबईची अवस्था होईल. महाराष्ट्रापासून विदर्भ आणि मुंबईला वेगळे केले जाईल. महाराष्ट्राचे लचके कुठलाही विचार न करता तोडले जातील, अशी टीका राज यांनी यावेळी केली.

देशातील प्रत्येक राज्याला स्वतंत्र्य अस्मिता असून देशात वेगवेगळ्या भाषा असल्यामुळे त्यानुसार प्रांतरचना करण्यात आली. पण आता नवनवीन कायदे करून भाजप सरकार प्रत्येक राज्याच्या अस्मितेचे महत्त्व कमी करीत आहे.

Leave a Comment