मुंबईतील तिरूपती देवस्थानाला कोट्यावधींची जमीन एक रुपया भाडेपट्टीने दान


मुंबई – राज्य सरकारने श्रीमंत तिरुपती देवस्थानाला मुंबईतील कोट्यवधींची जमीन एक रुपया भाडेपट्ट्याने देण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबईतील वांद्रे उपनगरातील शासकीय जमीन देवस्थानाच्या मागणीनुसार 30 वर्षांसाठी भाडेपट्ट्याने देण्यास झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली.

मुंबईतील कोट्यावधी रुपये किमतीची जमीन जगभरात प्रसिद्ध असलेल्या तिरुमला तिरुपती देवस्थानला केवळ एक रुपया भाडेपट्याने देण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे. विविध उपक्रमासाठी शासकीय जमीन विनामूल्य देण्याची मागणी तिरुमला देवस्थानाने राज्य सरकारकडे केली होती. मुंबईतील वांद्रे उपनगरात शासकीय जमीन तिरुमला तिरुपती देवस्थानाच्या मागणीनुसार भाडेपट्ट्याने देण्यास मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. तिरूमला तिरुपती देवस्थान, लहान तिरुपती बालाजी मंदिर, माहिती केंद्र, ई-दर्शन काऊंटर, पुस्तक विक्री केंद्र या प्रयोजनांसाठी ही जमीन वापरात आणली जाणार आहे.

आंध्र प्रदेश चॅरिटेबल अ‌ॅण्ड हिंदू रिलिजिअस इन्स्ट‍िट्यूशन्स अ‌ॅण्ड इंडोव्हमेंट्स अ‌ॅक्ट 1987 अंतर्गत तिरूमला तिरुपती देवस्थान ही संस्था स्थापन करण्यात आली आहे. वांद्रे येथे 648 चौरस मीटर शासकीय जमीन विनामूल्य देण्याची मागणी या संस्थेने महाराष्ट्र शासनाकडे केली होती. त्यानुसार तिरूमला तिरुपती देवस्थान या संस्थेस ही शासकीय जमीन 30 वर्ष एवढ्या कालावधीसाठी 1 रुपया इतक्या नाममात्र दराने वार्षिक भुईभाडे आकारून भाडेपट्ट्याने देण्यास मंजुरी देण्यात आली आहे. पुढच्या काही दिवसातच जमीन भाडेतत्वावर देण्याची शासकीय प्रक्रिया पूर्ण करून देवस्थानाच्या ताब्यात दिली जाणार आहे.

Leave a Comment