दादा कोंडके यांच्या जयंतीनिमित्त जाणून घ्या त्यांच्याबद्दल खास माहिती


मराठी चित्रपटातील असा एक अभिनेता ज्याने आपल्या चित्रपटाचे नावामुळे सेंसर बोर्डाला अक्षरशः वेड लावले होते. ‘डबल मिनिंग’ नाव असल्याने सेंसर बोर्ड चित्रपटाचे नावावर काही आक्षेप देखील घेता येत नसे. हा अभिनेता म्हणजे मराठी चित्रपटसृष्टीमधील लाडके व्यक्तीमत्त्व दादा कोंडके. अभिनेता आणि निर्माता दादा कोंडके यांचा जन्म 8 ऑगस्ट 1932 ला झाला होता. दादा कोंडके यांचे 9 चित्रपट तब्बल 25 आठवडे थेअटरमध्ये सुरू होते. दादा कोंडके यांच्या नावावर असलेला हा विक्रम गिनीज बुकमध्ये देखील नोंदवण्यात आला आहे. आज त्यांच्या जन्मदिनानिमित्त त्यांच्याबद्दल काही खास गोष्टी आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत.

दादा कोंडके यांचे खरे नाव कृष्णा कोंडके होते. लहानपण त्यांचे असेच मस्ती-गुंडगिरी करण्यात गेले. त्यांनी एकदा सांगितले होते की, भांडणामध्ये तर विट, दगड, बॉटलचा देखील वापर करत असे. दादा कोंडके राजकारणात देखील काही काळ सक्रिय होते. ते शिवसेनेशी जोडलेले होते. शिवसेनेच्या सभेमध्ये ते गर्दीला खेचून आणत असत, विरोधकांवर देखील जोरदार हल्ला करत असे.

दादा कोंडकेंचे मराठी नाटक ‘विच्छा माझी पूरी करा’ हा चांगला प्रसिध्द आहे. या नाटकाला काँग्रेस विरोधी असल्याचे समजले जाते. कारण या नाटकामध्ये इंदिरा गांधी यांची खिल्ली उडवण्यात आली आहे. त्यांनी या नाटकाचे तब्बल 1100 प्रयोग केले होते. तसेच 1975 मध्ये आलेला त्यांचा चित्रपट ‘पांडू हवलदार’ देखील चांगलाच गाजला. या चित्रपटानंतरच त्यांना हवालदार पांडू या नावाने ओळखले जाऊ लागले. याशिवाय ‘सोंगाड्या’, ‘आली अंगावर’ हे चित्रपट देखील विशेष गाजले.

गायक महेंद्र कपूर आणि दादा कोंडके यांची देखील चांगली मैत्री होती. कोंडकेंसाठी महेंद्र कपूर यांनी गायलेली गाणी चांगलीच गाजली. दादा कोंडके हे आपल्या विनोदी भूमिका आणि डबल मिनिंग डायलॉगसाठी आजही ओळखले जातात. दादा कोंडके यांच्या चित्रपटाची नावे देखील एवढी अश्लील असत की, सेंसर बोर्डाला देखील पास करताना लाज वाटत असे.

दादा कोंडके यांच्या आठवणीत मुंबईच्या भारतमाता सिनेमागृहात आजही त्यांचे चित्रपट दाखवले जातात. दादा कोंडके यांच्या 7 चित्रपटांनी गोल्डन जुबली केली, याचमुळे त्यांचा नाव गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये नोंदवले गेले. दादा कोंडके यांचे चित्रपट आजही लोकांना आवडतात. दादा कोंडके यांचे अनेक मराठी चित्रपट हिंदीत देखील बनवण्यात आले आहे. त्यांचा पहिला हिंदी चित्रपट ‘तेरे मेरे बीच मे’ हा होता.

Leave a Comment