विवोचा नवा एस १ स्मार्टफोन भारतात लाँच


चीनी कंपनी विवोने भारतात नव्या सिरीज एस मधला नवा स्मार्टफोन एस वन लाँच केला असून त्याचे एक व्हेरीयंट ८ ऑगस्टपासून विक्रीसाठी उपलब्ध आहे. कंपनीने तीन व्हेरीयंट मध्ये हा फोन सादर केला आहे. बेसिक व्हेरीयंटची किंमत १७९९० रुपये असून त्याला ४ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज दिले गेले आहे. ६ जीबी रॅम, ६४ जीबी स्टोरेज आणि ६ जीबी रॅम १२८ जीबी स्टोरेजच्या अन्य दोन फोनच्या किमती अनुक्रमे १८९९० आणि १९९९० अश्या आहेत. स्कायलाईन ब्ल्यू आणि डायमंड ब्लॅक कलर मध्ये हे फोन ग्राहकांना उपलब्ध होणार आहेत.

या फोनला ६.३८ इंची फुल एचडी सुपर एमोलेड डिस्प्ले इन बिल्ट फिंगरप्रिंट सेन्सरसह दिला गेला आहे. ३२ एमपीचा सेल्फी कॅमेरा एआय फेसब्युटी सेल्फी फ्रंटलाईन, एआर स्टिकर्स, एआय फिल्टर अश्या अनेक सेल्फी मोड सह आहे. रीअरला एआय ट्रिपल कॅमेरा सेटअप दिला असून त्यात १६ एमपीचा प्रायमरी तर ८ व २ एमपीचे अन्य दोन कॅमेरे आहेत. फास्टचार्जिंग टेक सपोर्ट करणारी ४००० एमएएच बॅटरी दिली गेली आहे. हा फोन रिव्हर्स चार्जिंगला सपोर्ट करतो. म्हणजे या फोनवरून अन्य डिव्हायसेस चार्ज करता येतात. फनटच ओएस ९ सह अँड्राईड ९ पाय ओएस आहे.

या फोनला एक स्मार्ट बटण दिले गेले असून सिंगल टॅप करून युजर गुगल असिस्टंट पर्यंत पोहोचू शकणार आहे.

Leave a Comment