पहिल्या महायुद्धावर आधारित ‘1917’चा ट्रेलर रिलीज


आता ‘1917’ हा पहिल्या महायुध्दावर आधारित चित्रपट घेऊन ऑस्कर विजेता दिग्दर्शक सॅम मेंडेस प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. या चित्रपटाला भारतात रिलायन्स इंटरटेन्मेंट रिलीज करणार असून या चित्रपटाचा ट्रेलर त्यांनीच ट्विटरद्वारे रिलीज केला आहे.

दोन युवा ब्रिटिश सैनिक स्कोफील्ड आणि ब्लेकला यांना पहिल्या महायुध्दादरम्यान एक मिशन दिले जाते. हे दोघे सैनिक असंभव असे हे मिशन पार पाडतात. या चित्रपटात याचे चित्तथरारक चित्रण दिसणार आहे. या चित्रपटात रिचर्ड मेडन, बेनडिक्च कंबेरबॅच, डिन चार्लेस, जॉर्ज मॅके, मार्क स्ट्राँग, डॅनियल मायस मुख्य भूमिकेत झळकणार आहेत. सॅम मेंडेस यांच्यासह क्रिस्टी विल्सन-केयनर्ससोबत या चित्रपटाची पटकथा लिहिली आहे. हा चित्रपट भारतात 2020च्या 10 जानेवारीला रिलीज होणार आहे.

Leave a Comment