विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचे काम करणार संभाजी ब्रिगेड


पुणे : विधानसभा निवडणुकीसाठी राज्यातील सर्वच प्रमुख पक्षांनी मोर्चेबांधणी सुरु केली आहे. राज्यभर विविध राजकीय पक्षांच्या यात्रा सुरु आहेत. त्यातच आता राष्ट्रवादी काँग्रेसला संभाजी ब्रिगेडने पाठिंबा जाहीर केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेससाठी विधानसभेचे काम करणार असल्याची घोषणा संभाजी ब्रिगेडने केली. हा निर्णय संभाजी ब्रिगेडचे नेते प्रवीण गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यकारिणीच्या बैठकीत घेण्यात आला.

लोकसभा निवडणुकीवेळी शेकापमधून काँग्रेसमध्ये प्रवीण गायकवाड यांनी प्रवेश केला होता. शिवाय प्रवीण गायकवाड यांनी लोकसभा निवडणुकीत काँग्रेसकडून तिकीट मिळावे यासाठी प्रयत्न केले होते. पण त्यांना काँग्रेसने तिकीट दिले नव्हते. पुणे लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसने प्रवीण गायकवाड यांना डावलून, काँग्रेसचे माजी आमदार मोहन जोशी यांना उमेदवारी दिली होती. त्यामुळे प्रवीण गायकवाड नाराज होते.

त्यांनी आता विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचे काम करणार असल्याचे सांगितले. आमची कोणतीही दखल काँग्रेसने न घेतल्यामुळे राष्ट्रवादीचे काम करण्याचा निर्णय आम्ही घेतला असल्याचे प्रवीण गायकवाड यांनी बैठकीनंतर सांगितले.

Leave a Comment