या पठ्ठ्याला जुना फ्रिज दरीत फेकने पडले महागात


एका व्यक्तीला आपला जुना फ्रिज कड्यावरून खाली फेकणे एवढे महागात पडले आहे की, तेवढ्या पैशात त्याने नवीन फ्रिज घेतला असता.

स्पेनमध्ये एका माणसाने त्याचा जुना झालेला फ्रिज कड्यावरून खाली टाकून दिला. मात्र पोलिसांनी त्याला तो फ्रिज पुन्हा तेथून काढायला सांगत त्याची व्यस्थित विल्हेवाट लावण्याचे आदेश दिले.


फ्रिज फेकणाऱ्या व्यक्तीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. स्पेनच्या पोलिसांकडून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. फ्रिज फेकतानाच्या व्हिडीओमध्ये व्यक्ती म्हणत आहे की, चला आता याला रिसायकल करूया आणि असे म्हणत तो फ्रिज कड्यावरून खाली ढकलून देतो.


व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी त्या माणसाचा शोध घेतल्यानंतर त्याला तो फ्रिज पुन्हा बाहेर काढण्यास सांगण्यात आले. तसेच, या कृत्यासाठी त्याला मोठ्या प्रमाणात दंड देखील भरावा लागणार आहे.

सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडीओ आतापर्यंत 7 लाखांपेक्षा अधिक वेळा बघितला गेला आहे.

Leave a Comment