‘5जी नेटवर्कवरून भारताला ब्लँकमेल करत आहे ड्रॅगन‘


हुवाईची 5 जी सेवा वापरण्यावरून चीन भारताला ब्लँकमेल करत असल्याचा आरोप  एका अमेरिकन काँग्रेसमनने केला आहे. तर भारत अमेरिकेच्या दबावाखाली येणार नाही अशी आशा असल्याचे चीनने म्हटले.

अमेरिकेने या आधीच हुवाईवर बंदी आणली आहे. ह्युएई स्मार्टफोन उत्पादन्नासाठी जगातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी कंपनी आहे. सिक्युरिटी हे कारण देत अमेरिकेने हुवाईवर बंदी घातली असून, इतर देशांवर देखील हुवाईवर बंदी घालण्यासाठी अमेरिका दबाव आणत आहे.

अमेरिकेने त्यांचे भारताबरोबरच अन्य देशानाही ह्युएईच्यी 5 जी इन्फ्रास्ट्रक्चरवर निर्बंध आणण्याची सुचना केली आहे. 5 जी या नवीन टेक्नोलॉजीच्या मदतीने 4 जीच्या तुलनेत डाऊनलोड स्पिड हा 10 ते 100 पट्टीने वाढणार आहे. हुवाईची 5 जी सेवा वापरण्यासाठी आता चीन भारताला ब्लँकमेल करत असल्याचे, अमेरिकन काँग्रेसमन जिम बँक्सने म्हटले आहे.

5 जी सेवा धोकादायक समजली जात आहे कारण या सेवेचा वापर हा नेक्स जनरेशन मोबाईल डिव्हाईसमध्ये वापरण्यात येणार आहे. ड्रायव्हरलेस कार अर्थात चालक नसलेल्या कारमध्ये देखील ही सेवा वापरली जाणार आहे.

अमेरिकेचे म्हणणे आहे की, हुवाईही चीनच्या लष्कराशी संबंधीत असून, याद्वारे हेरगिरी व माहिती चोरण्याचा प्रयत्न केला जात आहे. तसेच चीनचे म्हणणे आहे की, भारत हुवाईचा वापर करण्यासंबंधी स्वतंत्रपणे विचारकरून निर्णय घेईल.

सध्या डिजिटल टेक्नोलॉजीचा वापर आपल्या जीवनात वाढला आहे. मात्र 5 जी नेटवर्कमुळे देशाच्या सुरक्षिततेला धोका आहे. काही दिवसांपुर्वी आलेल्या रिपोर्टनुसार, भारत स्वतःची 5 जी नेटवर्क सेवा सुरू करणार आहे.

Leave a Comment